पुढारी वृत्तसेवा
रोजच्या जेवणात वापरले जाणारे मीठ शरीरासाठी आयोडीनची गरजही पूर्ण करते. पण बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या मिठांपैकी नेमके कोणते निवडावे? जाणून घ्या!
Cancer Surgeon डॉ. अर्जुन शंकरन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे योग्य मीठ निवडण्याबद्दल एक संपूर्ण गाईड शेअर केले आहे.
शरीरात आयोडीन कमी झाल्यास गलगंड, हायपोथायरॉईडीझम, स्मरणशक्ती, गर्भधारणेदरम्यान धोके वाढू शकतात. म्हणूनच योग्य मीठ निवडणे गरजेचे आहे.
शुद्ध मीठ नैसर्गिकरित्या पांढरे असते. भारतात विकल्या जाणाऱ्या पांढऱ्या मिठात कायद्यानुसार आयोडीन मिसळलेले असते, जे रोजच्या स्वैपाकासाठी उत्तम आहे.
सोशल मीडियामुळे गुलाबी मीठ आणि सैंधव मिठाचा वापर वाढला आहे. यामध्ये आयोडीन प्रमाण नगण्य असते. यांचा वापर रोज न करता कधीतरी चवीसाठी करावा!
गुलाबी मीठ, सैंधव, काळे मीठ आणि सेल्टिक सॉल्टमध्ये अतिरिक्त खनिजे कमी असतात. आयोडीन जवळपास नसतेच. त्यामुळे हे मीठ रोजच्या वापरात टाळावे.
भारतातील बहुतेक मीठ हे समुद्री मीठ असते. पॅकेटवर 'Iodised' (आयोडीनयुक्त) असे लिहिले असेल, तरच ते रोजच्या स्वयंपाकासाठी वापरावे.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी लो-सोडियम मीठ उपयुक्त ठरते. मात्र, मूत्रपिंड विकार किंवा पोटॅशियमच्या गोळ्या घेणार्यांनी डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय हे मीठ वापरू नये.
मिठाचा रंग महत्त्वाचा नसून त्यात आयोडीन असणे गरजेचे आहे. थायरॉईडच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आयोडीन आवश्यक आहे.
लोणचे आणि पापडांसह सर्व मीठ मिळून दिवसभरात १ चमच्यापेक्षा कमी वापरा, असा सल्लाही डॉक्टर देतात.