पुढारी वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार आपल्या जवळ असलेली छोटीशी वस्तू देखील आपल्या ऊर्जेवर परिणाम करत असते.
अनेकांना असे वाटते की, वास्तुशास्त्र म्हणजे केवळ घराची दिशा ठरवणे, पण तसे नाही. तुमच्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंमधील ऊर्जेचा परिणाम होत असतो.
घराच्या सजावटीच्या नावाखाली आपण आपल्या आवडीनुसार फोटो फ्रेम्स कुठेही लावतो. मात्र, त्या योग्य दिशेला लावणे अत्यंत आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा शुभ मानली जाते. जर या नियमांचे पालन केले, तर त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार, लग्नाचे फोटो किंवा फ्रेम्स कधीही उत्तर दिशेला लावू नयेत. तसेच, ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) देखील हे फोटो लावणे टाळावे.
तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे एकत्रित फोटो नेहमी दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेलाच लावले पाहिजेत. यामुळे घरात समृद्धी येण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व सामंजस्य टिकून राहते.
तुम्हाला देवदेवतांचे फोटो भिंतीवर लावायचे असतील, तर त्यासाठी ईशान्य कोपऱ्याची (ईशान कोण) निवड करावी. वास्तुशास्त्रात ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते.
घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात देवाव्यतिरिक्त इतर कोणतेही फोटो लावू नका. तसेच घराचे देवघर देखील ईशान्य कोपऱ्यातच असावे, असे वास्तुशास्त्र सांगते.
टीप: वरील इंटरनेटवरील माहितीवर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.