talkative psychology | सततची बडबड म्हणजे स्वभाव नव्हे; जाणून घ्या काय म्हणतंय मानसशास्त्र!

पुढारी वृत्तसेवा

मानसशास्त्रीय संशोधनानुसार, बहिर्मुख व्यक्तींच्या मेंदूतील 'रिवॉर्ड सिस्टम' अधिक सक्रिय असते. संवादातून त्यांना आनंद मिळतो, ज्यामुळे ते इतरांपेक्षा जास्त बोलतात.

संशोधनानुसार, अनेक लोकांना शांततेची भीती वाटते. ते शांतता टाळण्यासाठी सतत बोलतात. याला मानसशास्त्रात 'नर्व्हस टॉकिंग' म्हणतात. हे सहसा सामाजिक चिंतेतून उद्भवते.

'अतिचंचलता' ( 'अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर') असलेल्या मुलांमध्ये 'इम्पल्स कंट्रोल' कमी असतो. त्यांच्या मेंदूत विचार इतक्या वेगाने येतात की, ते शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, याला 'लॉगोरिया' म्हणतात.

स्वमग्नता किंवा नार्सिसिझम असलेल्या व्यक्तींना स्वतःचे महत्त्व पटवून द्यायचे असते. संशोधनानुसार, अशा व्यक्ती संवादावर ताबा मिळवून केवळ स्वतःबद्दल बोलण्यात धन्यता मानतात.

काही लोक 'व्हर्बल प्रोसेसर' असतात. म्हणजेच, जोपर्यंत ते एखादी गोष्ट मोठ्याने बोलून दाखवत नाहीत, तोपर्यंत त्यांना ती नीट समजत नाही. विचार स्पष्ट करण्यासाठी त्यांना बोलणे आवश्यक वाटते.

ऐकण्याची क्षमता कमी असणे : मानसशास्त्रात याला 'लिसनिंग डेफिसिट' म्हटले जाते. समोरच्याचे ऐकण्याऐवजी स्वतःचे उत्तर तयार करण्यात गुंतलेले मन व्यक्तीला सतत बोलायला भाग पाडते.

तणावमुक्तीचे माध्यम : सतत बोलल्यामुळे मेंदूतील कोर्टिसोल (Stress Hormone) पातळी कमी होण्यास मदत होते. तणाव कमी करण्यासाठी मेंदू संवादाचा आधार घेतो, असेही मानसशास्‍त्र सांगते.

मानसशास्त्रातील 'अप्रूव्हल सीकिंग' सिद्धांतानुसार, काही लोक स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा इतरांचे लक्ष वेधण्यासाठी प्रमाणाबाहेर बोलतात.

बायपोलर डिसऑर्डर किंवा हायपोमॅनियासारख्या स्थितीमध्ये विचारांचा वेग इतका वाढतो की, व्यक्ती सतत बडबड करू लागते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

येथे क्‍लिक करा.