Anirudha Sankpal
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दारामागे किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ चाव्या ठेवणे टाळावे, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते.
डायनिंग टेबलवर चाव्या ठेवल्यास घरात विनाकारण कलह निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.
स्वयंपाकघर आणि देवघरात चाव्या ठेवणे अशुभ मानले जाते, त्यामुळे घरात नकारात्मकता वाढून लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकते.
घराच्या चाव्या ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते, कारण या दिशांचा संबंध कुबेर आणि सूर्यदेवाशी आहे.
लिव्हिंग रूममध्ये की-होल्डर लावण्यासाठी घराचा पश्चिम कोपरा सर्वात योग्य आणि वास्तु नियमांनुसार अनुकूल असतो.