पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यातील ओलावा आणि पावसामुळे लिपस्टिक लवकर पसरते किंवा फिकी पडते.
जर तुमचीही लिपस्टिक ओठ खराब करत असेल, तर या ४ सोप्या ट्रीक्स नक्की फॉलो करा.
ट्रीक १: लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्यवस्थित एक्सफोलिएट करा आणि लिप बाम लावून ओठ हायड्रेटेड ठेवा.
ट्रीक २: ओठांच्या कडा स्पष्ट करण्यासाठी आणि लिपस्टिक पसरण्यापासून रोखण्यासाठी लिप लायनरचा वापर आवर्जून करा.
ट्रीक ३: पावसाळ्यात ग्लॉसी लिपस्टिकऐवजी मॅट किंवा वॉटरप्रूफ (Long-stay) लिपस्टिकची निवड करणे केव्हाही चांगले.
ट्रीक ४: लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवून हलकी ट्रान्सलुसेंट पावडर डॅब करा, ज्यामुळे ती 'स्मज-प्रूफ' होईल.
या साध्या टिप्स वापरून तुम्ही पावसाळ्यातही तुमचा लूक परफेक्ट ठेवू शकता.
आता पावसाचा आनंद घ्या आणि काळजी न करता सुंदर दिसा!