पुढारी वृत्तसेवा
वास्तूशास्त्रामध्ये गळलेल्या/तुटलेल्या केसांना घरात तसेच ठेवणे नकारात्मक मानले जाते.
वास्तू शास्त्रानुसार गळलेले केस घरात राहिल्यास राहू-केतूचे अशुभ प्रभाव सुरू होतात. अस्वच्छता आणि निष्काळजीपणामुळे शनी देव नाराज होऊ शकतात.
गळलेले केस घराचे कोपरे, बाथरूम किंवा इकडेतिकडे फेकून देत असाल, तर घरातील वातावरण नकारात्मक होऊ शकते. परिणामी, मन विनाकारण अस्वस्थ राहू शकते.
गळलेले केस चुकीच्या पद्धतीने फेकल्यामुळे ठरलेली कामे बिघडू लागतात. मेहनत करूनही यश मिळण्यास उशीर होऊ शकतो.
वास्तूशास्त्रानुसार अशा सवयींमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून तणाव आणि वाद वाढू शकतात.
गळलेले केस घरात राहिल्यास आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो.
गळलेले केस घरात राहिल्यास घरातील सुख-शांती आणि सकारात्मक वातावरणावर परिणाम होतो.
राहू-शनीच्या अशुभ प्रभावामुळे अस्वस्थता, भीती किंवा झोपेशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
गळलेले केस नेहमी एकत्र करून डस्टबीनमध्ये (कचऱ्याच्या डब्यात) टाकावेत. ते जमिनीवर, नाल्यात किंवा इकडेतिकडे फेकल्याने आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते.
टीप: ही माहिती वास्तूशास्त्रावर आधारित आहे. ती अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.