तुळशीजवळ चुकूनही लावू नका ‘ही’ झाडे; वास्तु देते इशारा

पुढारी वृत्तसेवा

तुळस ही देवी लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे.

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात शांती, सुख आणि समृद्धी वाढवते.

तुळशीजवळ काही झाडे लावल्याने तिची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते.

कॅक्टससारखी काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते.

अयोग्य झाडांमुळे कुटुंबात वाद-विवाद आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

वास्तुनुसार चिंचेचे झाड घरात जड आणि दडपणाचे वातावरण निर्माण करू शकते.

पिंपळ पवित्र असले तरी त्याची तीव्र ऊर्जा घरातील संतुलन बिघडवू शकते.

मनी प्लांट, अशोकाचे झाड आणि फुलझाडे तुळशीजवळ लावणे शुभ मानले जाते.

तुळशीच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते.