पुढारी वृत्तसेवा
वास्तू आणि फेंगशुईनुसार बाथरूमची ऊर्जा संपूर्ण घराला प्रभावित करते. यातील २ चुका आर्थिक टंचाईला आमंत्रण देतात.
आपण अनेकदा मुख्य द्वार किंवा स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देतो, पण बाथरूममधील छोट्या चुकांमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
बाथरूम वापरल्यानंतर दार उघडे ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. फेंगशुईनुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते.
फेंगशुईनुसार, बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा उघड्या दारावाटे संपूर्ण घरात पसरते; ज्यामुळे घरातील प्रगती आणि आर्थिकअडथळे येतात.
बाथरूम वापरल्यानंतर लगेच दार आणि टॉयलेट सीटचे झाकण बंद करण्याची सवय लावा.
नळ किंवा शॉवरमधून सतत थेंब-थेंब पाणी गळत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. फेंगशुईत हे गरिबीचे लक्षण मानले जाते.
पाण्याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे पाणी व्यर्थ वाहते, अगदी तसेच घरातील पैसाही नको त्या गोष्टींवर अनावश्यक खर्च होतो.
घरातील गळती लागलेले नळ लवकरात लवकर दुरुस्त करा. तसेच बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
बाथरूममधील नकारात्मकता दूर करण्यासाठी एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ किंवा तुरटीचे तुकडे ठेवून ती वाटी उंचावर ठेवा.
हे मीठ किंवा तुरटी दर १५ ते २० दिवसांनी बदलल्यास घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते.
टीप: वरील इंटरनेटवरील माहितीवर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.