Beetroot Health Benefits : लालचुटूक बीट ठरेल आरोग्यासाठी वरदान! रोज खाण्याचे 'हे' ८ भन्नाट फायदे नक्की वाचा!

पुढारी वृत्तसेवा

लालचुटुक बीट केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. जाणून घ्या याचे फायदे...

बीटमध्ये कॅलरीज अतिशय कमी असतात आणि व्हिटॅमिन्स-मिनरल्स भरपूर! संतुलित आहारासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

बीटमधील नायट्रेट्स शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात, ज्यामुळे हाय बीपीची समस्या दूर राहण्यास मदत होते.

बीटमधील 'बीटालेन्स' हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात.

नियमित बीट खाल्ल्याने स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे स्टॅमिना वाढतो आणि थकवा कमी होतो.

बीट हा डाएटरी फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. हे पचनक्रिया सुरळीत ठेवून बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

बीटमधील 'फोलेट' तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि पेशींच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते.

बीटमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कोलाजनचे प्रमाण वाढवून त्वचा चमकदार ठेवते.

बीटमधील नैसर्गिक घटक शरीरातील अंतर्गत सूज कमी करून सांधे आणि हृदय निरोगी ठेवण्‍यास मदत करतात.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.