Health Benefits Of Bay Leaf Water : उपाय एक, फायदे अनेक! जाणून घ्या तमालपत्राच्या पाण्याचे अद्भुत फायदे!
पुढारी वृत्तसेवा
तमालपत्राचा उपयोग फक्त खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नाही. या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
तमालपत्राचे पाणी एक नैसर्गिक औषध मानले जाते. रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
हे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
तमालपत्रात विषाणूंशी लढण्याचे गुणधर्म आहेत. सकाळी रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
तमालपत्राचे पाणी शरीराला आतून स्वच्छ करते. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी प्यायल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
तमालपत्राचे पाणी चयापचय (metabolism) क्रिया सुधारते. शरीराचे वजन कमी करण्यासही मदत होते.
हे पाणी शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर काढून शरीर शुद्ध करण्यास मदत करते.
ही माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी.कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
येथे क्लिक करा.