Anirudha Sankpal
घरातील मुख्य प्रवेशद्वार शक्यतो उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावे, यामुळे ऊर्जा आणि समृद्धी वाढते.
घराची उत्तर दिशा नेहमी स्वच्छ व मोकळी ठेवावी, त्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो.
उत्तर दिशेला चपला, कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, याने वास्तुदोष निर्माण होतो.
उत्तर दिशेला जड फर्निचर, पलंग ठेवू नयेत, यामुळे सकारात्मक ऊर्जा अडथळली जाते.
पूजा किंवा जप उत्तर दिशेला करताना लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाचे पूजन केल्यास घरात शुभ परिणाम मिळतात.
श्रीयंत्र उत्तर दिशेत ठेवल्याने आर्थिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती मिळते.
घराच्या उत्तर दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी, यामुळे धनवृद्धी व व्यापारात यश मिळते.
कासवाची प्रतिमा उत्तर दिशेत ठेवावी, यामुळे दीर्घायुष्य, स्थिरता व घरात शांती टिकते.
उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध राहते, प्रेम व सौहार्द वाढते.