Namdev Gharal
आपल्याकडे तुळसीला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते तसेच तुळशीला लक्ष्मीचे रूपही मानले जाते. ज्या घरात तुळस असते, तिथे सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार, अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत होते.
पण वास्तूशास्त्रानुसार तुळस अंगणात किंवा बाल्कनीत कोणत्या दिशेला लावली हे जाणून घेऊ, तुळस ही केवळ एक वनस्पती नसून ती 'ऊर्जेचा स्रोत' मानली जाते, म्हणून तिची जागा महत्त्वाची ठरते
कारण तुळस लावण्यासाठी विशिष्ट दिशा निवडण्यामागे धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्र आणि वनस्पती विज्ञान अशी तिन्ही कारणे आहे.
पूर्व दिशाः वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीला वाढण्यासाठी भरपूर आणि कोवळ्या सूर्यप्रकाशाची गरज असते. पूर्वेकडून येणारी सूर्याची पहिली किरणे तुळशीच्या पानांवर पडल्यास तिची वाढ उत्तम होते आणि तिचे औषधी गुणधर्म टिकून राहतात.
उत्तर दिशा (North): उत्तर दिशा ही थंड आणि आर्द्र मानली जाते, जी तुळशीच्या अस्तित्वासाठी पोषक असते. तुळशीचे रोपटे या दिशेला असल्यास अधिक चांगले वाढते
ईशान्य कोपरा (North-East): वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही 'देवतांची दिशा' मानली जाते. या कोपऱ्यात तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) प्रवेश करते.
नकारात्मकता दूर करणे: तुळस घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा उत्तर-पूर्व भागात असल्यास ती बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखते असे मानले जाते.
तुळस ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. उत्तर आणि पूर्व दिशांना आध्यात्मिकदृष्ट्या 'शुद्ध' मानले जाते, म्हणून या दिशांना तुळस लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि शांती लाभते अशी श्रद्धा आहे.
ही दिशा टाळावी : वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तुळस लावणे अशुभ मानले जाते. ही दिशा यमाची मानली जाते आणि इथे तुळस लावल्याने घरात अशांती किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी मान्यता आहे.
तुळस उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (ईशान्येला तोंड करून) दिशेला लावणे सर्वात उत्तम आहे. यामुळे वनस्पतीला पुरेसा प्रकाश मिळतो आणि घराचे वातावरणही मंगलमय राहते.