Namdev Gharal
देवाच्या पुजेमध्ये महत्वाचा घटक म्हणजे उदबत्ती, याच्या सुवासाने प्रसन्नता निर्माण होते आज याचा सरार्स वापर केला जातो पण याचे धार्मिक महत्व इतिहास माहिती आहे का
वैदिक काळात ऋषी-मुनी यज्ञ करत असत. यज्ञात टाकली जाणारी समिधा आणि तूप यामुळे जो सुवासिक धूर निर्माण व्हायचा, त्यातूनच पुढे 'धूप' देण्याची पद्धत रूढ झाली
सुरुवातीला नैसर्गिक डिंक, राळ, चंदन आणि सुवासिक लाकूड यांचा वापर करून धूप दिला जात असे.
हिंदू धर्मात देवाच्या पूजेचे पाच मुख्य उपचार (गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य) मानले जातात. यामध्ये धूप (उदबत्ती) हा वायू तत्त्वाचे प्रतीक मानला जातो.
पूर्वी फक्त 'धूप' किंवा सुवासिक लाकूड (चंदन) जाळले जायचे. त्यात काडी नसायची. १८ व्या शतकात वापरण्यास सोपे जावे म्हणून बांबूच्या बारीक काडीवर कोळसा, सुगंधी तेल आणि डिंक यांचे मिश्रण लावण्यास सुरुवात झाली
भारतात आज आपण जी काडीची उदबत्ती पाहतो, तिचे श्रेय प्रामुख्याने म्हैसूर (कर्नाटक) येथील कारागिरांना जाते. उत्तरेत अगरबत्ती म्हटले जाते. यामध्ये ‘अगर ’ लाकडाची काडी असते
१९०० च्या सुरुवातीला म्हैसूरमध्ये अशा प्रकारच्या 'अगरबत्ती' बनवण्याचा पहिला व्यावसायिक कारखाना सुरू झाला. म्हणूनच म्हैसूरला 'अगरबत्तीची राजधानी' म्हटले जाते.
'उदबत्ती' हा शब्द 'ऊद' आणि 'बत्ती' (वात किंवा काडी) या दोन शब्दांपासून बनला आहे. सुरुवातीला यात फक्त 'ऊद' या नैसर्गिक पदार्थाचा वापर व्हायचा, म्हणून याला उदबत्ती म्हटले जाऊ लागले.
नकारात्मकता दूर करणे: मानले जाते की उदबत्तीच्या सुगंधामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक विचार दूर होऊन वातावरण प्रसन्न होते.