पुढारी वृत्तसेवा
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही अंधार किंवा अस्वच्छता ठेवू नका.
मुख्य दरवाजा आकर्षक नसेल, तर घरातील सदस्यांच्या करिअरमधील प्रगतीच्या संधी कमी होतात.
नळातून विनाकारण पाणी टपकणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते.
घरात पाण्याची नासाडी झाल्यास कुटुंबात आजारपण आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
कधीही वापरात न येणारे जुने कपडे आणि पादत्राणे घरात साठवून ठेवू नका.
वास्तूशास्त्रानुसार, निरुपयोगी वस्तू साठवल्याने कुंडलीत राहू दोष निर्माण होतो आणि आर्थिक चणचण वाढते.
घराचे दरवाजे उघडताना-बंद करताना आवाज येत असल्यास तो मोठा वास्तुदोष मानला जातो.
घरात लावलेले खराब किंवा फाटलेले पोस्टर्स त्वरित हटवा; यामुळे घरात वादविवाद वाढतात.
घरात वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्यास करिअरमध्ये चढ-उतार आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते.