Namdev Gharal
थंडीचे दिवस आले की प्रत्येकाच्या घरामध्ये एक गोष्ट हमखास दिसून येते ती म्हणजे व्हॅसलिन, कोरड्या त्वचेसाठी फुटलेल्या ओठांसाठी व्हॅसलिनच उपयोगाला येते.
व्हॅसलीन हे एका ब्रँडचे नाव असले तरी ती पेट्रालियम जेली असते. म्हणजे हा पदार्थ व आपण वाहनात टाकतो ते पेट्रोल याचा थेट संबध आहे. याचा इतिहास खूप रंजक आहे.
व्हॅसलिनचा शोध रॉबर्ट ऑगस्टस चेसब्रो या २२ वर्षीय ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञाने १८५९ मध्ये लावला.
1859 साली अमेरिकेत पहिली तेलविहीर (Oil Well) सापडली. तेल काढताना मशीनवर एक चिकट, मेणासारखा काळसर पदार्थ साचायचा. त्यामुळे मशिन खराब व्हायची
पण हाच मेणासारखा काळा पदार्थ कामगार आपल्या जखमांवर लावत आणि जखम लवकर बरी होत असे. कामगार या पदार्थाला “Rod Wax” म्हणत.
ही गोष्ट रॉबर्ट यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही त्यांनी : ही गोष्ट पाहून चेसब्रो यांनी तो पदार्थ आपल्या लॅबमध्ये आणला. त्यांनी अनेक वर्षे त्यावर प्रयोग केले,
त्यातील काळा रंग आणि उग्र वास काढून टाकण्यासाठी त्याचे शुद्धीकरण (Purification) केले आणि अखेर एक पांढरट-पारदर्शक जेली तयार केली व त्याचे पेटंट घेतले. ते म्हणजे व्हॅसलिन
१८७० मध्ये त्यांनी याला 'व्हॅसलिन' असे नाव देऊन विक्री सुरू केली. तेव्हापासून जखमा किंवा कोरड्या थंडीत ओठ फटल्यावर त्वचा कोरडी झाल्यावर त्याचा वापर केला जातो
आताच्या आधुनिक जगात पेट्रोलियम पदार्थापासून तेल वेगळे केल्यानंतर त्याच्या गाळावर विविध प्रक्रिया केल्या जाताता व पांढरट रंगाची क्रीम तयार केली जाते तीच पेट्रोलियम जेली.
Vaseline हा शब्द जर्मन शब्द 'Wasser' (पाणी) आणि ग्रीक शब्द ग्रीक शब्द 'Elaion' (तेल) यांच्या मिश्रणातून तयार झाला आहे.
याचे निर्माते रॉबर्ट चेसब्रो स्वतःच्या अंगावर जखमा करून घेत किंवा स्वतःची त्वचा जाळून घेत आणि लोकांसमोर व्हॅसलिन लावून ते कसे बरे होते हे दाखवत असत