पुढारी वृत्तसेवा
भारतीय थाळीतील वरण-भात आणि चपाती रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहेत; पण यातून शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते का? जाणून घेवूया
शाकाहारी आहारात डाळींना प्रोटीनचा मुख्य स्रोत मानले जाते; १०० ग्रॅम कच्च्या डाळीत २०-२३ ग्रॅम प्रोटीन असते.
डाळ शिजवून पातळ केल्यावर त्यातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते; दोन वाटी डाळीतून साधारण १५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.
भात हा प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सचा स्रोत आहे; दोन वाटी शिजवलेल्या भातातून सुमारे ५ ते ८ ग्रॅम प्रोटीन मिळते.
गव्हाच्या चपातीतूनही शरीराला थोडे प्रोटीन मिळते; दिवसभरात चार चपात्या खाल्ल्यास साधारण १२ ते १३ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.
वरण, भात आणि चपाती एकत्र केल्यास एका सर्वसामान्य जेवणातून दिवसभरात ३३ ते ३५ ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते.
सर्वसाधारण निरोगी व्यक्तीला प्रत्येक किलो वजनामागे रोज सुमारे ०.८ ग्रॅम प्रोटीनची गरज असते; ६० किलो वजनासाठी जवळपास ४८ ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे.
केवळ वरण-भात-चपातीवर अवलंबून राहिल्यास दैनंदिन प्रोटीनची गरज अपुरी राहू शकते.
आहारात पनीर, सोयाबीन, दूध, दही, टोफू तसेच अंडी किंवा चिकन यांचा समावेश करून प्रोटीनची गरज सहज पूर्ण करता येते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.