पुढारी वृत्तसेवा
रायझिंग स्टार आशिया कपमध्ये युएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने फलंदाजीचा झंझावात दाखवून दिला.
अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक: सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत वैभवने युएईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.
२८ चेंडूत ऐतिहासिक शतक: लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावत वैभवने नवा विक्रम रचला.
४० चेंडूत दीडशतकी मजल: शतकाचा जल्लोष सुरू असतानाच वैभवने ४० चेंडूत दीडशतक पूर्ण करत सर्वांना थक्क केले.
वैभवने ५२ चेंडूत द्विशतक ठोकून अविश्वसनीय कामगिरी केली.
एका डावात सर्वाधिक 28 षटकार ठोकण्याचा विक्रम नावावर करत त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.
वैभवने आजच्या खेळीत 28 षटकार, 7 चौकार फटकावत ५२ चेंडूत द्विशतक पूर्ण केले.
१४.३ षटकांत विजय: वैभवच्या झंझावाती २०४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने युएईचे २४९ धावांचे लक्ष्य अवघ्या १४.३ षटकांत पार केले.