Brain Facts : दर मिनिटाला तुम्ही ‘ब्लाइंड’ होता; मेंदूची ही ७ गुपितं वाचून थक्क व्हाल!

पुढारी वृत्तसेवा

मेंदू केवळ विचार किंवा निर्णय घेण्यापुरता मर्यादित नाही; तो प्रत्येक सेकंदाला शरीर आणि मनाचं रक्षण करणारी अद्भुत यंत्रणा आहे.

मेंदू न सांगता अशी कोणती ७ कमाल कामं करतो, ज्यामुळे तुम्ही सुरक्षित आणि सक्रिय राहता?

मोठी दुखापत झाल्यावर मेंदू त्वरित एंडोर्फिन्स रसायन सोडतो; हा नैसर्गिक पेनकिलर काही काळ वेदना कमी करून सुरक्षित जागा गाठायला मदत करतो.

अचानक संकट ओढावल्यास मेंदू वेगाने माहितीवर प्रक्रिया करतो; त्यामुळे सगळं स्लो मोशनमध्ये घडत असल्याचा भास होऊन प्रतिसाद देणं सोपं जातं.

डोळ्यांची उघडझाप होताना क्षणभर अंधार येतो; पण मेंदू ती पोकळी भरून काढतो. युनिर्व्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (UCLA) येथील संशोधनात डोळ्यांच्या हालचाली आणि मेंदूच्या दृष्य प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.

गाढ झोपेत मेंदू स्नायूंना तात्पुरतं शांत ठेवतो, जेणेकरून स्वप्नातील हालचाली शरीरातून प्रत्यक्षात घडणार नाहीत आणि तुम्ही सुरक्षित राहाल.

अतिशय कठीण किंवा धक्कादायक प्रसंग मेंदू खोलवर दडवून ठेवतो; मन खचू नये म्हणून हा मेंदूचा एक प्रकारचा स्व-बचाव असतो.

तणावात असताना शरीरातून काही रसायने बाहेर पडतात, ज्याची जाणीव इतरांना नकळत होऊ शकते. भीतीच्या प्रसंगी होणाऱ्या या बदलांवर क्वीन्स युनिव्हर्सिटी मधील संशोधनासह विविध अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे.

पडणारी वस्तू झेलण्याआधीच मेंदू पुढील क्षणाचा अंदाज बांधतो; त्यामुळेच तुमची प्रतिक्रिया क्षणार्धात आणि अचूक ठरते.

येथे क्‍लिक करा.