Iran-US Tensions | इराणचे टेन्शन वाढले! 'त्रिपोली' युद्धाच्या दिशेने? काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

पुढारी वृत्तसेवा

अमेरिका मध्यपूर्वेमध्ये आपले सैन्यबळ वाढवत आहे, अमेरिकेची आणखी एक युद्धनौका सिंगापूरजवळील मलाक्का सामुद्रधुनीपाशी पोहोचली आहे.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, 'मॅरिटाइम ट्रॅकिंग डेटा'वरून असे समोर आले आहे की, मंगळवारी 'USS त्रिपोली'दक्षिण चीन समुद्राच्या नैऋत्य टोकावर पोहोचली होती.

'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका 'USS त्रिपोली'द्वारे मध्यपूर्वेमध्ये अधिक मरीन सैनिकांना पाठवण्याची शक्यता आहे.

USS त्रिपोलीचे मुख्य काम समुद्री किनाऱ्यावरून जमिनीवर सैन्य आणि लष्करी सामग्री उतरवणे आहे.

USS त्रिपोली ही युद्धनौका ८५० फूट लांब आहे.

त्रिपोलीवर F-35 स्टेल्थ फायटर्स, MV-22 ऑस्प्रे ट्रान्सपोर्ट्स आणि सैनिकांना किनाऱ्यावर नेण्यासाठी लागणाऱ्या लँडिंग क्राफ्ट्स तैनात आहेत.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणविरुद्धच्या युद्धात सुमारे ५०,००० अमेरिकन सैनिक आधीच मध्यपूर्वेत तैनात आहेत.

अमेरिकेने यापूर्वी 'USS अब्राहम लिंकन' आणि 'USS जेराल्ड आर. फोर्ड' या नौका त्या प्रदेशात पाठवल्या आहेत.

अरबी समुद्र, तांबडा समुद्र आणि पूर्व भूमध्य समुद्रात अमेरिकेच्‍या १६ हून अधिक युद्धनौका तैनात आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या अनेक 'अर्ले बर्क-क्लास' डिस्ट्रॉयर्सचा समावेश आहे.

येथे क्‍लिक करा.