Drone Warfare | इराणचे 'शाहेद'-अमेरिकेचे 'ल्युकास'! ड्रोनने कशी बदली युद्धाची परिभाषा?

पुढारी वृत्तसेवा

आधुनिक युद्धात ड्रोन हे निर्णायक घटक ठरत आहेत. इराणचे शाहेद-136 (Shahed-136) हे कमी खर्चाचे आणि 'वापरा आणि फेकून द्या' या तत्त्वावर आधारित ड्रोन आहे.

अमेरिकेने इराणच्याच डिझाइनचे रिव्हर्स-इंजिनिअरिंग करून 'ल्युकास' (LUCAS) ड्रोन विकसित केले आहे.

क्षेपणास्त्राच्या तुलनेत शाहेदची किंमत अत्यंत कमी आहे. इराणच्या सरकारी मालकीच्या 'शाहेद एव्हिएशन इंडस्ट्रीज'ने विकसित केलेले शाहेद-136 हे 'वन-वे' अटॅक ड्रोन आहे.

शाहेदमध्‍ये डेल्टा-विंग (त्रिकोणी पंख) भूमिती, मागील बाजूस पुशर प्रोपेलर आणि साधी नेव्हिगेशन यंत्रणा आहे. क्षेपणास्त्रांना स्वस्त पर्याय म्हणून हे तयार करण्यात आले आहे.

अमेरिकेचे LUCAS (Low-Cost Uncrewed Combat Attack System) हे शाहेदच्या डेल्टा-विंग डिझाइनचीच प्रतिकृती असल्‍याने आता जागतिक स्तरावर चर्चेत आले आहेत.

शाहेद-136 ड्रोन सुमारे २,००० किमी पर्यंत प्रवास करते. सुमारे ५० किलो वजनाचे स्फोटक वाहून नेते.

LUCAS लांब पल्ल्याचा ड्रोन आहे. याचा भर स्फोटकांच्या वजनापेक्षा 'नेटवर्क ऑपरेशन्स' आणि ड्रोनमधील परस्पर समन्वयावर जास्त आहे.

शाहेद ड्रोन प्रामुख्याने जीपीएस (GPS) आणि प्रक्षेपणापूर्वी प्रोग्राम केलेल्या डेटावर अवलंबून आहे.

याउलट, LUCAS मध्ये प्रगत नेटवर्किंग फीचर्स आहेत. अनेक ड्रोन मोहिमेदरम्यान एकमेकांशी समन्वय साधू शकतात. बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकतात. यालाच 'स्वार्म ऑपरेशन्स' असे म्हणतात.

शाहेद-136 ड्रोनची किंमत $२०,००० ते $५०,००० (सुमारे १७ ते ४२ लाख रुपये) दरम्यान आहे.

LUCAS ड्रोनची किंमत अंदाजे $३५,००० (सुमारे २९ लाख रुपये) आहे.

पारंपारिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ड्रोन कमी किंमतीत तयार होत असल्‍याने, आधुनिक युद्धात शत्रूची संरक्षण यंत्रणा थकवण्यासाठी ते अत्यंत प्रभावी ठरत आहेत.

येथे क्‍लिक करा.