स्वालिया न. शिकलगार
रोज चहा पिल्यानंतर ती फेकून न देता पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून घ्या
ही वाळवलेली चहापूड कुंड्यांतील मातीमध्ये मिसळा. जमिनीतील सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होते
घरगुती कंपोस्ट खड्डा किंवा बिन असेल तर चहापूड त्यात टाका, ती लवकर विघटित होते
फ्रिज, बूटांचे कपाट, कचरापेटीजवळ ठेवली तर दुर्गंध कमी होण्यास मदत होऊ शकते
काही भांडी किंवा काचेच्या वस्तूंवरील डाग काढण्यासाठी वापरलेली चहापूड सौम्य स्क्रबरप्रमाणे वापरता येते
हस्तकला, कागद, कापडाला जुना, तपकिरी छटा देण्यासाठी चहापुडीचा अर्क वापरला जाऊ शकतो
टी-बॅग्ज थंड करून डोळ्यांवर काही मिनिटे ठेवल्यास सूज किंवा थकवा कमी होते
मात्र डोळ्यांना संसर्ग किंवा अॅलर्जी असल्यास हा उपाय करू नये