पुढारी वृत्तसेवा
१९९७ ते २०१२ पर्यंत जन्मलेल्यांना जेन झेड म्हणतात. ही जनरेशन पुर्ण डिजीटल युगात जन्मल्याने त्यांना आय जनरेशन सुध्दा म्हटले जाते.
या जनरेशनला सर्वात जास्त पॉप क्लचरच वेड आहे. डिजीटलाजेशन मुळे पॉप क्लचरला अधिक चालना मिळाली आणि ते ही याच जनरेशन मध्ये.
डिजीटल युगात लांबची गोष्टी अगदी काही सेकंदात मोबाईल वर दिसत असल्याने ही पिढी वेस्ट्रन क्लचरशी जास्त प्रभावीत आहे, मग तो एखादा ट्रेंड असो किंवा फॅशन.
ह्या पिढीच सोशल्याझेशन म्हणजे सोशल मिडिया वर किती फॉलोव्हर्स आणि फ्रेंड आहेत.
अपभाषा, बोलचाली ची भाषा किंवा बोलायला सहज अशी भाषा शब्द म्हणजे स्लंग्स.
स्लंग्स वापरण्याच अजुन एक कारण की स्लंग्स वापरल्याने वेळ वाचतो आणि सोबतच एक स्पीड तयार होते.
जेन झेड च्या मते स्लंग्स वापरल्या मुळे ते कमी शब्दांत जास्त भावना व्यक्त करु शकतात.
स्लंग्स वापरल्याने जेन झेड आपापसात लवकर मिसळले जातात.
एखाद्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी जेन झेड स्लंग्सचा जास्त वापर करतात.