us iran conflict 2026 | अमेरिकेने युद्धाच्या मैदानात 'डेव्हिल डॉग्स'लाच का उतरवले?

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने 'मरीन एक्स्पेडिशनरी युनिट'मधील सुमारे २,५०० निवडक सैनिकांना मध्यपूर्वेत तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

हे सैन्य 'यूएसएस त्रिपोली' आणि 'यूएसएस बॉक्सर' यासारख्या उभयचर युद्धनौकांवरून इराणला रवाना होत आहेत.

अमेरिकन मरीन (नौदल पायदळ) सैनिकांना 'डेव्हिल डॉग्स' या नावाने ओळखले जाते. हे सैनिक पाणी आणि जमीन या दोन्‍हींवर उत्‍कृष्‍ट समन्‍वय साधत शत्रूला नेस्‍तनाबूत करण्‍याच्‍या कौशल्‍यासाठी ओळखले जातात

पहिल्या महायुद्धातील भीषण लढाई दरम्यान जर्मन सैनिकांनी अमेरिकेतील नौदलातील जावांना हे नाव दिले होते. आज, हेच नाव आक्रमक आणि अत्‍यंत वेगवान प्रतिसादासाठी ओळखल्या जाणाऱ्या लढाऊ दलाचे प्रतीक बनले आहे.

इराणकडून होणारी संभाव्य नाकेबंदी रोखून 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सुरक्षित ठेवणे हा 'डेव्हिल डॉग्स'च्‍या तैनातीचा मुख्य उद्देश आहे.

जगातील कच्च्या तेलाच्या एकूण व्यापारापैकी सुमारे २० टक्के व्यापार 'होर्मुझची सामुद्रधुनी' सागरी मार्गातून होतो.

इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने सुरुवातीला केवळ हवाई हल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु आता मरीन सैनिकांच्या आगमनामुळे जमिनीवर लष्करी कारवाई करण्याचे महत्त्वाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

लष्करी विश्लेषकांच्या मते, इराणच्या 'खार्ग बेट' येथील तेल टर्मिनलसारख्या धोरणात्मक ठिकाणांचा ताबा घेण्यासाठी 'डेव्हिल डॉग्स'च्‍या तुकडीचा दलाचा वापर केला जाऊ शकतो.

येथे क्‍लिक करा.