अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला. .या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. .हे एक अमेरिकेने विकसित केलेले, लांब पल्ल्याचे आणि अत्यंत अचूक मारा करणारे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे..ही क्षेपणास्त्रे प्रामुख्याने समुद्रातील जहाजे आणि पाणबुड्यांवरून डागली जातात..टॉमहॉक क्षेपणास्त्राची रेंज सुमारे १६०० किमी असून जमिनीवरील जहाजे आणि पाणबुड्यांवरून Mk 41 वर्टिकल लाँच सिस्टमद्वारे ते डागले जाते..१९९१ च्या पर्शियन आखाती युद्धापासून टॉमहॉक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. .या क्षेपणास्त्राचं वजन जवळपास ३,२०० पाउंड आहे, तर लांबी १८.३ फूट आहे..अत्यंत महागडं पण तितकंच प्रभावी असलेलं एक टॉमहॉक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी अंदाजे १६ कोटी रुपये खर्च येतो..इराणचा फोर्डो येथील भूमिगत अणुप्रकल्प, जो डोंगराच्या आत आहे, त्याला बी-२ बॉम्बर्सनी लक्ष्य केले..अमेरिकन पाणबुड्यांमधून तब्बल ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रे इराणच्या दिशेने डागण्यात आली..जानेवारी २०२४ मध्येही अमेरिकेने मध्य पूर्वेतील हुथींच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ८० हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता..वरुण धवनच्या हिरोईनचं बॉयफ्रेंडसोबत परदेशात गुपचूप लग्न