वरुण धवनच्या हिरोईनचं बॉयफ्रेंडसोबत परदेशात गुपचूप लग्न

पुढारी वृत्तसेवा

वरुण धवनच्या 'एबीसीडी' चित्रपटातील अभिनेत्रीने लॉरेन गॉटलीबने तिच्या प्रियकराशी गुपचूप लग्न केले.

त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

११ जून २०२५ रोजी टस्कनी, इटलीमध्ये विवाहसोहळा पार पडला.

टोबियासने ऑगस्ट २०२४ मध्ये लॉरेनला प्रपोज केलं होतं.

 लॉरेनचा वेडिंग लूक ग्लॅमर आणि साधेपणा यांचा उत्तम समतोल होता.

लॉरेनने ऑफ-शोल्डर, मरमेड स्टाइलचा पांढरा गाऊन परिधान केला होता. तिचा डीप नेकलाइन डिझाइनचा लूक चर्चेत आहे.

हा सोहळा अत्यंत खाजगी होता, ज्यात फक्त जवळचे कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.

लॉरेनच्या एन्ट्रीवेळी लाईव्ह सिंगरचे गाणे, शॅम्पेन टॉवर आणि फटाक्यांची आतषबाजी हे या सोहळ्याचे खास आकर्षण होते.

एकदाच होणारं प्रेम... आणि ते मिळालं, असं लॉरेनने म्हटलं आहे.

Rakul Preet Singh | file photo
साडीमध्ये तू भारीच दिसतेस...; रकुल प्रीतचं नजरेत भरणारं सौंदर्य