स्वालिया न. शिकलगार
कान्स २०२६ च्या रेड कार्पेटवर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे सगळ्यात महागडा लूक
अंदाजे १५५.८७ दशलक्ष डॉलर्स इतक्या महागड्या आऊटफिटमध्ये ती रेड कार्पेटवर उतरली
कान्समधील आतापर्यंतचा सर्वात महागड्या पोशाखांपैकी एक ठरला आहे
व्हिएतनामच्या कूटूर हाऊस 'जोलीपोली कूटूर'ने हा ड्रेस डिझाईन केलाय
आलिया भट्टचा दुसरा लूक अगदी प्रिन्सेस सारखा होता
तिने एका बातचीतमध्ये महिला-प्रधान चित्रपटांच्या जागतिक यशावर भाष्य केले
'बार्बी', 'द डेव्हिल वेअर्स प्राडा २' आणि 'वदरिंग हाईट्स' यांसारख्या महिला-प्रधान चित्रपटांवर ती बोलली
चित्रपट पुरुषांना डोळ्यासमोर ठेवून बनवले जात असतील, तर महिला प्रेक्षकांची गरज कोण पूर्ण करेल, असेही ती म्हणाली
''आपण असे चित्रपट का बनवू शकत नाही, जे लिंग-निरपेक्ष असतील, ज्यामध्ये कथेलाच मध्यवर्ती स्थान असेल''
''चित्रपटात मुख्य भूमिकेत एखादा पुरुष असो किंवा स्त्री, याने काहीही फरक पडता कामा नये"