Konkan Ganesh Utsav: कोकणात मध्यरात्री गावकरी शेजाऱ्यांच्या दारात हळूच गणपती ठेवून का जातात?

Anirudha Sankpal

पारंपरिक प्रथा

कोकणातील काही गावांमध्ये गणपती उत्सवादरम्यान एक अत्यंत अनोखी आणि आनंदाने पाळली जाणारी स्थानिक प्रथा पाहायला मिळते.

संयुक्त कुटुंबाची परंपरा

पूर्वी एकत्र कुटुंबात (Joint Family) राहत असताना संपूर्ण कुटुंबाचा एकच सामूहिक गणपती बसवण्याची पद्धत असते.

नवीन घराची निर्मिती

यातील एखाद्या कुटुंबाने नंतर स्वतःचे नवीन किंवा वेगळे घर बांधले, तरी त्यांचा मुख्य गणपती अजूनही मूळ घरातच असतो.

रात्रीची सरप्राईज व्हिजिट

गणपतीच्या दिवसांत गावातील किंवा शेजारील काही लोक रात्रीच्या वेळी गुपचूप एक गणपती घेऊन त्या नव्या घरात जातात.

बाप्पाची स्थापना

ते लोक घरच्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बाप्पाला थेट त्यांच्या घरात किंवा दारात ठेवून येतात आणि आनंददायी सरप्राईज देतात.

फटाक्यांची आतषबाजी

घराबाहेर अचानक होणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने घरातील मंडळी जागी होतात आणि दारात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतात.

पूजेची जबाबदारी

एकदा बाप्पा घरात ठेवला की त्या नवीन घरच्यांना नियमानुसार त्या गणपतीची पूजा आणि प्रतिष्ठापना करावीच लागते.

अनोखा आनंद

बाप्पा थेट अशा सरप्राईज रूपाने घरी आल्यामुळे संपूर्ण कुटुंबात एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा