बाप्पांच्या मूर्तीत दडलांय खास संदेश! मुलांना नक्की शिकवा हे १० जीवनमंत्र

निलेश पोतदार

मोठ्ठं डोकं – मोठा विचार करा, रागाच्या भरात निर्णय न घेता आधी शांतपणे विचार करा.

मोठे कान – मध्ये न बोलता समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकण्याची सवय लावा.

लहान डोळे – एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्याचा बाप्पाचा गुण शिका.

बाप्पाची सोंड – ताकद म्हणजे मारणं नाही, तर योग्य वेळी इतरांना मदत करणं होय.

एक अर्धा दात – चूक झाली तरी निराश न होता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा.

मोठं पोट – राग, दुःख आणि इतर भावना शांतपणे व्यक्त करून त्यांना पचवायला शिका.

उंदीर वाहन – मन आणि विचार इकडे-तिकडे धावत असले तरी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.

मोदक – गोड बोलणं, प्रेमाने वागणं आणि आनंद इतरांसोबत वाटल्याने तो वाढतो.

आशीर्वादाचा हात – भीती न बाळगता आत्मविश्वासाने नवीन गोष्टी करण्याचं धाडस ठेवा.

बाप्पाचा संदेश – मुलांना फक्त बाप्पाची मूर्ती दाखवू नका, तर त्यांचे गुणही आपल्या स्वभावात उतरवायला शिकवा.