पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदात हे सर्वात उबदार आणि पौष्टिक तेल मानलं जातं.
तिळाचं तेल शरीराचं तापमान संतुलित ठेवतं. दररोज हलकं गरम करून मालिश केल्यास थंडीपासून संरक्षण मिळतं.
कोरडी त्वचा मऊ, ओलसर आणि चमकदार बनवते. हिवाळ्यात रात्री हलकं तिळ तेल लावल्यास त्वचा तजेलदार राहते.
गरम तिळ तेलाने मसाज केल्यास केस मजबूत होतात. गळती कमी होते आणि नैसर्गिक चमक वाढते.
थंडीमुळे होणाऱ्या वेदनांवर तिळ तेल उत्तम उपाय. मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि जडपणा कमी होतो.
थोड्या प्रमाणात आहारात वापरल्यास पचन सुधारतं. रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला उष्णता देते.
“अभ्यंग” म्हणजे तिळ तेलाने शरीरमालिश ही आयुर्वेदिक पद्धत. नाकात दोन थेंब तिळ तेल टाकल्यास सर्दी-डोकेदुखीपासून आराम मिळतो.