High Blood Pressure आहे 'सायलेंट किलर'! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका?

पुढारी वृत्तसेवा

रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब सातत्याने खूप जास्त असणे म्‍हणजे रक्‍तदाब. शरीर काही लक्षणे दाखवते;पण याकडे दुर्लक्ष केल्‍यास हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. रक्तदाब वाढल्‍याचे संकेत देणारी काही लक्षणे पाहूया...

Canva

काही वेळा अचानक आणि विनाकारण नाकातून रक्‍त येते. त्याचा संबंध वाढलेल्या रक्तदाबाशी असू शकतो. उच्च रक्तदाबामुळे नाकातील लहान रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते.

Canva

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. रक्‍तदाब अति वाढला असल्‍यास कधीकधी अंधुक किंवा दुहेरी दृष्टी दिसू शकते.

Canva

सकाळच्या वेळी सातत्याने आणि तीव्र डोकेदुखी हेही उच्च रक्तदाबाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

Canva

उच्च रक्तदाबामुळे रक्ताभिसरण बिघडते. यामुळे थकवा, चक्कर येणे किंवा गोंधळल्यासारखे वाटू शकते.

Canva

काही व्यक्तींना उच्च रक्तदाबामुळे हृदयावर ताण आल्याने छातीत अस्वस्थता जाणवू शकते.

Canva

उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडू शकते, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

Canva

थोडेसे काम केल्यावर किंवा शांत बसले असतानाही धाप लागणे हेही उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

Canva

वरीलपैकी कोणतेही लक्षण असल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. कारण उच्‍च रक्‍तदाबाला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. कारण याची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

Canva
येथे क्‍लिक करा.