Walking benefits : चालण्याची जपानी पद्धत पारंपरिक १०,००० पावलांपेक्षा अधिक प्रभावी? जाणून घ्या फायदे
पुढारी वृत्तसेवा
नियमित चालण्याचा व्यायाम करणार्यांमध्ये दररोज १० हजार पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते; पण ते पूर्ण करणे कठीण जाते.
Canva
पारंपारिक १०,००० पावले नियमित चालण्याऐवजी, ३० मिनिटांची चालण्याची जपानी पद्धत तुम्हाला माहित आहे का?
Canva
चालण्याच्या जपानी पद्धतीबाबत ( इंटरव्हल वॉकिंग ) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे.
Canva
जपानी इंटरव्हल वॉकिंगमध्ये केवळ पावलांच्या संख्येवर नव्हे, तर हालचालीच्या गुणवत्तेवर आणि तीव्रतेवर भर दिला जातो.
Canva
या पद्धतीमध्ये सामान्यपणे ३ मिनिटे जलद चालणे आणि त्यानंतर ३ मिनिटे हळू चालणे असा क्रम असतो. हे चक्र रोज ३० मिनिटांसाठी केले जाते.
Canva
या व्यायामानंतर हृदयाचे ठोके पुन्हा सामान्य करण्यासाठी ५-१० मिनिटे कूल-डाऊन व्यायाम किंवा स्ट्रेचेस करा.
Canva
नियमित इंटरव्हल वॉकिंग केल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
Canva
वेगाने चालल्याने हृदयाचे ठोके लक्षणीयरीत्या वाढतात. एका अभ्यासानुसार, या व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
Canva
गाढ झोप लागते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
Canva
धावण्यापेक्षा इंटरव्हल वॉकिंगचा हाडांवर आणि सांध्यांवर कमी ताण येतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे.
Canva
कोणत्याही व्यक्तीसाठी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. कारण व्यायामामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व्यक्तीपरत्वे बदलू शकतात.
Canva
येथे क्लिक करा.