Namdev Gharal
तुम्हाला माहिती आहे का मुंग्यांची झोप ही तुकड्या तुकड्यांची असते त्या सलग कधीच झोपत नाहीत
आणखी एक गोष्ट म्हणजे मुंग्याना फुप्फूसे नसतात. त्याऐवजी श्वसनासाठी लहान छिद्रं (spiracles) असतात
सर्व प्राण्यांचे रक्त हे लाल रंगाचे असते पण अपवाद खेकडा असतो. त्याचे रक्त निळ्या रंगाचे असते. त्याच्या शरिरात हेमोस्यानिन नावाचे रसायन असते त्यामुळे रक्त निळे होते
कोणत्याही सजीवाला एक हृदय असते पण ऑक्टोपसला मात्र तिन हृदये असतात. तर 9 मेंदू असतात १ मुख्य तर ८ सपोर्टसाठी त्याच्या हातांमध्ये मेंदू असतात
घोडा हा असा प्राणी आहे जो उभ्या- उभ्याच झोपतो. कारण त्याच्या स्नायूंमध्ये Stay apparatus नावाची खास रचना असते.
जगातील सर्वात मंद प्राणी म्हणजे स्लॉथ. तो एका मिनिटाला केवळ ४ मिटरच चालतो. हा वेग प्रतितास 0.24 किमी इतका कमी असतो
कुत्र्यासाठी चॉकलेट म्हणजे विषासमान असते. कारण त्यामध्ये Theobromine असते जे कुत्र्यासाठी हानिकारक असते
गांडूळ हा या कृमीविषयी अनोखी गोष्ट म्हणजे, त्याला ५ हृदये असतात. पण ही हृदये aortic arches नावाचे पंपींग करणारे अवयव असतात.
डॉल्फिन मासा एक डोळा उघडा ठेऊन झोपू शकतो. त्याला unihemispheric sleep म्हणतात. कारण त्याचा अर्धा मेंदू जागा असतो.