Namdev Gharal
कुकीकटर शार्क या माशाची बाईट एकदम परफेक्ट असते. हा मासा कोणत्याही मोठ्या माशांना घाबरत नाही कारण चावा घेऊन जखमी करण्यास हा तरबेज असतो
या माशाचा चावा अगदी एखाद्या बिस्किीटासारखा (Cookie)गोल परफेक्ट असतो. यामुळेच याला हे नाव पडले ‘कुकीकटर’, याचे दात सुताराच्या करवतीसारखे धारदार असतात.
हा एक लहान, सिगार सारखा लांबुटक्या आकाराचा खोल-समुद्रातील शार्क आहे, ज्याची लांबी साधारण 40–56 सेमीपर्यंत असते.
हा समुद्रात खोल उष्ण आणि उबदार भागांत साधारण १००० पेक्षा जास्त मिटर खोल सुमुद्रात राहतो. रात्रीच्या वेळी पृष्ठभागावर येऊन पोहतो.
मोठे ट्युना, इतर शार्क, यासह डॉल्फिन, व्हेल, सील इत्यादींचे बाईट हा मासा घेतो
यांची दंतरचना खूप विशेष आहे: वरच्या जबड्याचे दात लहान, टोकदार असतात आणि खालील जबड्यातील दात मोठे, करवतीसारखे असतात
मोठ्या प्राण्यांना हे चावणे दुखणारे असते पण बहुतेकवेळा त्यांची जखम बरी होऊन जाते, काहीवेळी अनेकांनी चावा घेतला तर मासा मरु शकतो.
या माशाची लांबी साधारण दीड फुटांपर्यंत असते. वजन साधारण साधारण 1.5 ते 1.8 किलोपर्यंत असते