स्वालिया न. शिकलगार
पुदिनाचे हे आहेत विविध प्रकार : पेपर मिंट- तीव्र सुगंध, जास्त मेंथॉल असलेली जात.
चहा, कँडी, औषधे आणि टूथपेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
स्पिअर मिंट- सौम्य चवीचा पुदिना.
चटणी, रायता, सलाड, पेये आणि स्वयंपाकात सर्वाधिक वापरला जातो.
ॲपल मिंट-पानांना हलका सफरचंदासारखा सुगंध असतो.
हर्बल टी आणि सजावटीच्या बागांमध्ये याचा वापर केला जातो.
चॉकलेट मिंट - पानांना चॉकलेटसारखा सौम्य सुगंध येतो. (प्रत्यक्ष चॉकलेटची चव नसते)
डेझर्ट, चहा आणि सजावटीसाठी लोकप्रिय आहे.