पुढारी वृत्तसेवा
पतंजलीचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण यांनी केळी आणि दूध सेवनाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकून आरोग्याशी संबंधित एक नवीन टिप शेअर केली आहे
बाळकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार प्रथम दोन पिकलेली केळी खावीत आणि त्यानंतर लगेच कोमट दूध प्यावे. ही प्रक्रिया महिनाभर सुरू ठेवावी
दररोज दोन पिकलेली केळी खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट दूध असे एक महिना घेतल्यास शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीर अधिक मजबूत होण्यास मदत होते
वजन वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद मिळवून देण्यासाठी अनेक दशकांपासून घरातील ज्येष्ठ व्यक्ती केळी आणि दूध घेण्याचा सल्ला देत आहेत
एका पिकलेल्या केळ्यामध्ये सुमारे १०० कॅलरीज असतात. त्यासोबत पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखरही असते, ज्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते
दुधातून प्रथिने, कॅल्शियम आणि चरबी मिळते. त्यामुळे केळी आणि दूध घेतल्याने एकाच वेळी ऊर्जा आणि पोषण मिळण्यास मदत होते
ज्यांना दुधाची अॅलर्जी आहे किंवा लॅक्टोजचे पचन होत नाही, त्यांनी हा उपाय नियमितपणे करण्यापूर्वी काळजी घ्यावी
आचार्य बाळकृष्ण यांनी केळी दुधात मिसळून त्याचा शेक बनवू नये, असे सांगितले आहे. त्यांचा सल्ला म्हणजे आधी केळी खावे आणि ते पूर्ण झाल्यानंतर दूध प्यावे
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दिवसातून किती केळी खावीत, याकडे लक्ष द्यावे, केळ्यातील नैसर्गिक साखरेचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो