पुढारी वृत्तसेवा
डाळिंबामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यातील रसाळ, कुरकुरीत आणि आंबट-गोड दाणे खायला अतिशय स्वादिष्ट लागतात
डाळिंबाचे दाणे काढणे ही नेहमीच वेळखाऊ आणि पसारा करणारी प्रक्रिया असते, त्यामुळे प्रत्येकाला ती कटकट वाटू लागते
डाळिंब चुकीच्या पद्धतीने कापले तर त्याचा चिकट लाल रस फरशी, कपडे आणि चॉपिंग बोर्डवर उडतो आणि त्याचे डाग सहज निघत नाहीत
योग्य पद्धतीने डाळिंबाला चिरा देऊन आणि लाकडी चमच्याचा वापर करून ३० सेकंदांत दाणे सहज काढता येतात
डाळिंब चॉपिंग बोर्डवर ठेवा. ते मधोमध उभे कापू नका. त्याऐवजी डाळिंबाचा वरचा मुकुटासारखा भाग साधारण अर्धा इंच कापून काढा
डाळिंबाच्या दाण्यांच्या गटांमध्ये पांढऱ्या रंगाच्या पडद्यांसारख्या रेषा दिसतील. चाकूच्या मदतीने या नैसर्गिक रेषांच्या दिशेने वरून खालीपर्यंत हलक्या चिरा द्या
वरच्या मध्यभागी दोन्ही अंगठे ठेवून ते हलकेच बाहेरच्या दिशेने ओढा. चिरांच्या ठिकाणी डाळिंब आपोआप वेगवेगळ्या भागांत उघडेल. दाणे दिसू लागतील
डाळिंबाचा एक उघडलेला अर्धा भाग किंवा एक फोड घ्या. त्याचा कापलेला भाग खाली आणि साल वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने तळहातावर घेऊन खाली बाऊल ठेवा
त्यानंतर लाकडी चमचा घ्या आणि डाळिंबाच्या सालीच्या मागील बाजूवर टकटक करा. या कंपनामुळे दाणे सुटून काही सेकंदांत थेट बाऊलमध्ये पडतात