Tutankhamun | 2 लाख कोटींचा खजिना सापडलेली तुतनखामेनची ममी!

Namdev Gharal

तूतनखामेन हा प्राचीन इजिप्तच्या १८ व्या राजवंशातील (18th Dynasty) राजा होता. त्याचा काळ साधारणपणे इ.स.पू. १३४१ ते १३२३ (1341 BC to 1323 BC) असा मानला जातो.

त्याने वयाच्या ९ व्या वर्षी सत्ता हाती घेतली आणि केवळ १० वर्षे (इ.स.पू. १३३२-१३२३) राज्य केले. केवळ 19 वर्षाचा असतानाच त्‍याचा मृत्‍यू झाला

ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर (Howard Carter) यांनी १९२२ मध्ये इजिप्तमधील 'व्हॅली ऑफ द किंग्स' मध्ये या थडग्याचा शोध लावला. यामध्ये तुतनखोमनची ममी व खजाना होता

हे थडगे आतापर्यंतचे सर्वात सुरक्षित आणि अखंड सापडलेले इजिप्शियन थडगे आहे.या थडग्याची कोणीही लूटमार केलेली नव्हती

तज्ञांच्या मते या कबरीत सापडलेल्या खजिन्याची किंमत २ बिलियन डॉलर्स ते २५ बिलियन डॉलर्स (सुमारे १६,००० कोटी ते २ लाख कोटी रुपये) किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते.

तूतनखामेनच्या थडग्यात एकूण ५,००० पेक्षा जास्त मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. यातील सोन्याचा मुखवटा हा ११ किलो शुद्ध सोन्याचा असून आज प्रमुख आर्कषण आहे.

सोन्याची शवपेटी: राजाचा मृतदेह तीन थरांच्या शवपेटीत होता, ज्यातील सर्वात आतील पेटी ही ११० किलो वजनाच्या शुद्ध सोन्याची होती.

तसेच या ममीबरोबर सोन्याचे सिंहासन, रथांचे सांगाडे, सोन्याचे दागिने, चपला, धनुष्यबाण, सुगंधित तेले आणि तसेच वाळवलेले अन्नही सापडले होते.

त्याच्या मृत्यूचे कारण आजही संशोधनाचा विषय आहे. काही संशोधकांच्या मते त्याचा मृत्यू रथावरून पडून झालेल्या जखमेमुळे किंवा मलेरियामुळे झाला असावा.

तूतनखामेनच्या कबरीशी जोडलेला 'ममीचा शाप' (The Curse of the Pharaohs) हे इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानले जाते.

kohinoor