Namdev Gharal
मुळचा भारताचा पण सध्या ब्रिटनच्या राणीच्या मुकटाची शान वाढवणारा हिरा म्हणजे कोहिनूर, हा जगातील सर्वात मौल्यवान हिरा मानला जातो. त्याचा इतिहासही खूप रंजक आहे
आता तेलंगाणा राज्य आहे पूर्वी हा गोवळकोंडा विभाग होता याठिकाणी कृष्णा नदीच्या आसपास अनेक हिऱ्यांच्या खाणी होत्या. स्थानिक लोक हिर शोधण्याचे काम करत असत
याठिकाणीच 14 व्या शतकात अंदाजे 1307 ते 1310 या दरम्यान येथील स्थानिक लोकांना हा हिरा खाणीत सापडला यावेळी त्याचे वजन जवळपास 700 कॅरेटच्या आसपास होते.
या स्थानिक लोकांनी हा हिरा त्यावेळचा काकतीय राजवंशातील राजाकडे नेऊन दिला हे साल होते अंदाजे 1310 च्या दरम्यान
त्यानंतर १४ व्या शतकात अलाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतावर आक्रमण करून हा हिरा मिळवला. पुढे तो मुघल सम्राट शहाजहानच्या 'मयूर सिंहासनाचा' (Peacock Throne) मुख्य भाग बनला.
पुढे १७३९ मध्ये इराणचा शासक नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केले. जेव्हा त्याने हा चमकणारा हिरा पाहिला, तेव्हा त्याच्या तोंडून शब्द निघाले— "कोह-इ-नूर!". तेव्हापासून हे काहिनूर नाव रूढ झाले.
नादिर शाहनंतर हा हिरा अफगाणिस्तानात गेला. पुढे १८१३ मध्ये अफगाण शासक शाह शुजा याने हा हिरा शिख साम्राज्याचे संस्थापक महाराज रणजित सिंह यांना भेट दिला. रणजित सिंह हा हिरा आपल्या दंडावर बांधत असत.
दुसऱ्या शिख युद्धातील विजयानंतर, ब्रिटिशांनी १० वर्षांचे महाराज दलिप सिंह यांच्याकडून लाहोरच्या तहावर स्वाक्षरी करून घेतली आणि कोहिनूर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. ते साल होते 1849
लॉर्ड डलहौसीने हा हिरा इंग्लंडला पाठवला आणि ३ जुलै १८५० रोजी तो राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द करण्यात आला. राणीला तो हिरा फारसा आवडला नाही, म्हणून त्याला पुन्हा पैलू पाडून लहान करण्यात आले.
आज हा १०५.६ कॅरेटचा हिरा लंडनच्या 'टावर ऑफ लंडन' (Tower of London) मध्ये ठेवला आहे. तो दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात जडवलेला आहे.