पुढारी वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या जीवनात आपले मन सतत 'हाय-अलर्ट' मोडमध्ये असते. कामाचा प्रचंड दबाव, मोबाईलच्या सततच्या नोटिफिकेशन्स आणि दैनंदिन चिंतांमुळे आपली मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) थकून जाते.
अशा तणावपूर्ण परिस्थितीत एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे झाडाला स्पर्श करणे किंवा मिठी मारणे. ऐकायला हे कदाचित विचित्र वाटेल; पण याला शास्त्रीय आधार आहे.
जेव्हा आपण एखाद्या झाडाला स्पर्श करतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या सर्वात स्थिर, शांत आणि प्राचीन जिवंत प्रणालीशी जोडले जातो.
आपले शरीर पाणी, खनिजे आणि सूक्ष्म इलेक्ट्रिक सिग्नलची एक प्रणाली आहे. आपण झाडाला स्पर्श करतो, आपली मज्जासंस्था हळू हळू शांत होऊ लागते.
हृदयाचे ठोके कमी होतात, मनातील गोंधळ शांत होतो, तणाव कमी होतो यामुळेच झाडाजवळ उभे राहिल्यास लोकांना नैसर्गिकरित्या शांतता आणि आराम जाणवतो.
आपले हृदय एक छोटेसे चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा हे क्षेत्र अस्थिर होते. परंतु, झाडाच्या संपर्कात आल्यावर हे क्षेत्र स्थिर आणि संतुलित होऊ लागते. त्यामुळे मनातील बेचैनी कमी होते.
विज्ञान म्हणते की, झाडांजवळ राहणे मन आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. जपानमध्ये याला 'फॉरेस्ट बाथिंग' किंवा 'शिनरीन-योकू' म्हणतात. येथे लोक केवळ जंगलात वेळ घालवून तणावातून मुक्त होतात.
निसर्गाची स्वतःची एक शांत लय आहे. झाडे त्या लयीचा सर्वात शक्तिशाली स्रोत आहेत. जेव्हा आपण झाडाला स्पर्श करतो, तेव्हा आपले शरीराला एक प्रकारची स्थिरता जाणवते.
पुढील वेळी जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असाल तेव्हा कोणताही झाड निवडा. जुने, मोठे आणि मजबूत झाड जास्त प्रभावी ठरते. झाडाला हाताने स्पर्श करून फक्त १० ते १५ सेकंद उभे राहा. तुम्हाला तुमच्या शरीरात सूक्ष्म बदल जाणवतील.