पुढारी वृत्तसेवा
डॉक्टरांच्या मते प्रवासात होणाऱ्या उलटीला मोशन सिकनेस असे म्हणतात. हा आजार नसून शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
प्रवासात डोळे, कान आणि शरीरातील हालचाली यांच्याकडून मेंदूला वेगवेगळे संकेत मिळतात. या गोंधळामुळे उलटीसारखी लक्षणे दिसतात.
आतील कानातील व्हेस्टिब्युलर सिस्टिम शरीराचा तोल सांभाळते. वाहनाच्या हालचालींमुळे ही यंत्रणा बिघडते.
मेंदूचा गोंधळ थेट पोटावर परिणाम करतो. त्यामुळे मळमळ, उलटी, पोटात अस्वस्थता जाणवते.
लहान मुलांची तोल सांभाळणारी यंत्रणा पूर्ण विकसित नसते, त्यामुळे त्यांना प्रवासात उलटी जास्त होते.
रिकाम्या पोटी किंवा फार जड जेवण करून प्रवास केल्यास उलटीची शक्यता वाढते, असे डॉक्टर सांगतात.
वाहनातील उकाडा, पेट्रोलचा वास, धूर किंवा बंद वातावरणामुळे मळमळ अधिक वाढते.
प्रवासाची भीती, चिंता किंवा मानसिक तणाव असलेल्या लोकांना मोशन सिकनेस लवकर होतो.
हलका आहार, समोर पाहत बसणे, ताजी हवा घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेतल्यास उलटी टाळता येते.