पुढारी वृत्तसेवा
लाल लिपस्टिक लावणे हा फॅशनचा भाग असला तरी, एका देशात हा चक्क गुन्हा मानला जातो.
उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिक लावण्यावर कडक निर्बंध आहेत. हुकूमशहा किम जोंग उनच्या नियमानुसार, लाल रंग हा फक्त राष्ट्रीय प्रतीकांसाठी राखीव आहे.
उत्तर कोरियात येथे लाल रंग हा कम्युनिस्ट पार्टी आणि किम कुटुंबाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे महिलांनी लाल लिपस्टिक लावल्यास तो सत्तेचा अपमान समजला जातो.
लाल लिपस्टिक लावताना पकडले गेल्यास पहिल्यांदा इशारा दिला जातो. त्यानंतर भरचौकात अपमान केला जातो. पुन्हा गुन्हा केल्यास जेलची हवा खावी लागते.
केवळ लालच नाही, तर भडक रेड शेड्स, सोन्याचे दागिने, पाश्चात्य पद्धतीचा मेकअप करण्यासही मनाई आहे. फक्त सौम्य रंगांचा वापर करण्याची परवानगी आहे.
हुकूमशहा किम जोंगची बहीण किम यो जोंग देखील लाल लिपस्टिक लावत नाही.
उत्तर कोरिया सरकारनुसार,भडक मेकअप हा भांडवलशाहीचा प्रभाव आहे. यामुळे तरुणाई पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होऊन राजवटीस धोका निर्माण करेल असे मानले जाते.
उत्तर कोरियात केवळ लिपस्टिकच नाही, तर जीन्स, परदेशी हेअरस्टाईल आणि पियर्सिंगवरही बंदी आहे. महिलांना केवळ सरकारने मान्यता दिलेला पेहराव आणि मेकअपच करावा लागतो.