पुढारी वृत्तसेवा
प्रवासात चेहऱ्याची विशेष काळजी आवश्यक
ट्रिपवर गेल्यावर फोटो, व्हिडिओ, फिरणं यामुळे थकवा येतो आणि त्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसतो. त्यामुळे चेहरा फ्रेश ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं.
फेस वॉश किंवा क्लिन्झर
दिवसभर धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज होते. छोट्या साईजचा फेस वॉश किंवा क्लिन्झर बॅगमध्ये ठेवल्यास चेहरा लगेच स्वच्छ आणि ताजा वाटतो.
मॉइश्चरायझर किंवा जेल
प्रवासात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे हलका मॉइश्चरायझर किंवा अॅलोवेरा जेल सोबत ठेवल्यास त्वचेला ओलावा मिळतो.
सनस्क्रीन क्रीम
उन्हात फिरताना त्वचेचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. सनस्क्रीन लावल्यास टॅनिंग आणि सनबर्नपासून बचाव होतो.
बीबी क्रीम किंवा लाइट फाउंडेशन
जड मेकअप न करता नैसर्गिक लुक हवा असेल तर बीबी क्रीम उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहरा उजळ दिसतो आणि त्वचाही श्वास घेते.
लिप बाम किंवा लिपस्टिक
कोरडे ओठ संपूर्ण लुक खराब करतात. त्यामुळे ओठ मऊ ठेवण्यासाठी लिप बाम किंवा न्यूड शेडची लिपस्टिक बॅगमध्ये असावी.
काजळ किंवा मस्कारा
डोळ्यांना थोडासा उठाव देण्यासाठी काजळ किंवा मस्कारा पुरेसा ठरतो. यामुळे कमी मेकअपमध्येही चेहरा फ्रेश दिसतो.
ब्लॉटिंग पेपर किंवा कॉम्पॅक्ट पावडर
घाम किंवा अतिरिक्त तेल शोषण्यासाठी ब्लॉटिंग पेपर खूप उपयोगी ठरतो. कॉम्पॅक्ट पावडरमुळे चेहऱ्याला मॅट लुक मिळतो.
परफ्युम किंवा फेस मिस्ट
लांब प्रवासात थकवा जाणवतो. अशावेळी हलका परफ्युम किंवा फेस मिस्ट वापरल्यास ताजेपणा लगेच जाणवतो.