पुढारी वृत्तसेवा
पांढरे कपडे परिधान केल्यावर व्यक्तिमत्त्वात वेगळाच उठाव येतो. विशेषतः ऑफिस, मीटिंग्स किंवा अधिकृत कार्यक्रमांसाठी पांढरा रंग अधिक पसंत केला जातो.
डाग लवकर दिसण्याची समस्या
पांढरे कपडे जितके सुंदर दिसतात, तितक्याच पटकन त्यावर डागही उठून दिसतात. थोडासा चहा, कॉफी किंवा हळद पडली तरी कपडे खराब झाल्यासारखे वाटतात.
चहा-कॉफीचे डाग कसे काढाल?
चहा किंवा कॉफीचा डाग लागलेला भाग लगेच थंड पाण्याने धुवा. त्यावर थोडा बेकिंग सोडा लावून हलकेच चोळल्यास डाग फिका होतो.
हळदीचे हट्टी डाग घालवण्याचा उपाय
हळदीचा डाग लागल्यास त्या ठिकाणी लिंबाचा रस टाका आणि उन्हात वाळत ठेवा. सूर्यप्रकाशामुळे हळदीचा पिवळसरपणा कमी होतो.
शाईचे डाग हटवण्याची युक्ती
पांढऱ्या कपड्यांवरील शाईचा डाग काढण्यासाठी कापसावर थोडा अल्कोहोल किंवा सॅनिटायझर घेऊन डागावर हलक्या हाताने थोपटावे.
व्हिनेगरचा वापर फायदेशीर
पांढरे कपडे धुताना पाण्यात थोडेसे पांढरे व्हिनेगर घातल्यास डाग कमी होतात आणि कपड्यांचा रंग उजळतो.
साबणाऐवजी सौम्य उपाय वापरा
जास्त केमिकलयुक्त साबण किंवा ब्लीच वापरल्यास कपडे पिवळसर होऊ शकतात. त्यामुळे सौम्य डिटर्जंट किंवा घरगुती उपाय अधिक सुरक्षित ठरतात.
कपडे लगेच धुणे महत्त्वाचे
डाग पडल्यावर कपडे जास्त वेळ तसेच ठेवू नयेत. जितक्या लवकर कपडे धुतले जातील तितक्या सहजपणे डाग निघतात.
योग्य काळजी घेतली तर टिकेल पांढरपणा
पांढरे कपडे वेगळे धुणे, योग्य प्रकारे वाळवणे आणि वेळोवेळी घरगुती उपाय वापरणे यामुळे कपडे दीर्घकाळ नवीसारखे दिसतात.