पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यातील पारंपरिक पेय
कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि उष्माघातापासून बचाव करणारे पारंपरिक पेय आहे.
लागणारे साहित्य
कच्ची कैरी, साखर किंवा गूळ, मीठ, भाजलेले जिरेपूड आणि पाणी.
कैरी शिजवून घ्या
कच्च्या कैऱ्या कुकरमध्ये २–३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या किंवा उकळत्या पाण्यात मऊ होईपर्यंत उकळा.
गर काढा
शिजलेली कैरी थंड झाल्यावर तिचा गर वेगळा काढून घ्या.
मिश्रण तयार करा
गरात साखर/गूळ, मीठ आणि जिरेपूड घालून चांगले मिक्स करा.
पन्हं तयार करा
या मिश्रणात पाणी घालून पातळ करून पन्हं तयार करा.
चवीनुसार बदल करा
गोड-तिखट चवीनुसार साखर, मीठ आणि जिरेपूड कमी-जास्त करू शकता.
थंड करून सर्व्ह करा
पन्हं फ्रिजमध्ये थंड करून दिल्यास अधिक ताजेतवाने वाटते.
आरोग्यदायी फायदे
कैरीचं पन्हं शरीराला ऊर्जा देते, उष्णता कमी करते आणि डिहायड्रेशनपासून बचाव करते.