Jhulhan method for baby: लहान मुलांच्या सर्दीवर घरगुती, आयुर्वेदिक मात्र प्रभावी उयाप

Anirudha Sankpal

आयुर्वेदिक दृष्टिकोन

आयुर्वेदामध्ये लहान मुलांवरील उपचार नेहमी सौम्य आणि नैसर्गिक असतात, म्हणूनच शरीराला थकवा न देता आराम देणाऱ्या बाह्य उपायांना प्राधान्य दिले जाते.

झुल्हन विधी म्हणजे काय

ही एक पारंपारिक पद्धत असून यामध्ये औषधी घटक छाती आणि पाठीवर बांधले जातात, ज्यामुळे शरीराला नैसर्गिक उष्णता मिळून आराम मिळतो.

आवश्यक साहित्य

या विधीसाठी ताजी विड्याची पाने (पान), मोहरीचे तेल आणि १-२ थेंब 'अमृतधारा' या साध्या पण प्रभावी साहित्याची गरज असते.

मिश्रण तयार करणे

मोहरीचे तेल हलके कोमट करून त्यात १-२ थेंब अमृतधारा मिसळा आणि हे मिश्रण विड्याच्या पानाच्या आतील बाजूला व्यवस्थित लावा.

वापरण्याची पद्धत

तेल लावलेले हे पान बाळाच्या छातीवर आणि पाठीवर ठेवून त्यावर मऊ सुती कपड्याने हलकी पट्टी बांधावी.

वेळ

हा 'झुल्हन' उपाय शक्यतो रात्रीच्या वेळी करावा आणि ते रात्रभर तसेच राहू द्यावे जेणेकरून त्याचा परिणाम हळूहळू होत राहील.

फायदे

विड्याच्या पाण्याचे गुणधर्म आणि तेलाची स्निग्धता यामुळे छातीतील कफ सुटतो, श्वास घेण्यास सुलभता येते आणि बाळाला शांत झोप लागते.

महत्त्वाची खबरदारी

विड्याचे पान थेट गरम करू नये आणि हा उपाय केवळ बाह्य उपचारासाठीच मर्यादित ठेवावा.

वैद्यकीय सल्ला

जर बाळाला तीव्र ताप असेल किंवा जास्त अस्वस्थ वाटत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

येथे क्लिक करा