Intelligent Dogs Breeds | सर्वाधिक बुद्धिमान कुत्र्यांच्या जाती माहित आहेत का?

अविनाश सुतार

वेल्श टेरियर त्यांच्या निर्णयक्षमता आणि शिकारीच्या युक्त्यांसाठी ओळखले जातात. सुरुवातीला ते थोडे खट्याळ असते, पण चांगल्या प्रशिक्षणानंतर ते अतिशय निष्ठावान आणि संरक्षक बनते

ओल्ड इंग्लिश शीपडॉग हे सामाजिक, आनंदी स्वभावाचे असते. त्याला लोकांच्या सहवासात राहायला आवडते, ते उत्तम राखणदार असून उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाते, दीर्घकाळ एकटे राहिल्यास दुःखी आणि विध्वंसक होऊ शकते

गॉर्डन सेटर हे राजेशाही जातीचे कुत्रे आहेत. शिकारीसाठी पाळले जात असले तरी, त्यांच्या विश्वासार्हतेसाठी, उत्कृष्ट स्मरणशक्तीसाठी, आणि सहनशक्तीसाठी ते ओळखले जाते

इंग्लिश स्प्रिंगर स्पॅनियल हे मूळतः शिकारसाठी "गन डॉग" म्हणून विकसित करण्यात आलेले हे कुत्रे शिकार ओळखणे आणि शोधणे यात अतिशय पारंगत असते, ते हायकिंग किंवा कॅम्पिंगसाठी उत्तम साथीदार ठरतात

ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग हे सतर्क आणि जिज्ञासू असतात. इतर प्राण्यांच्या हालचाली नियंत्रित करण्याची त्यांच्यात नैसर्गिक प्रवृत्ती असते. ते अतिशय बुद्धिमान असतात

बॉर्डर कॉल्ली हे जगप्रसिद्ध जनावरे हाकणारे कुत्रे आहे. ते सर्वात चपळ, संतुलित आणि टिकाऊ जातींपैकी आहेत.

गोल्डन रिट्रिव्हर हे अतिशय मेहनती असतात. आज्ञाधारकपणा आणि कामातील बुद्धिमत्तेसाठी ते चौथ्या क्रमांकावर आहेत. ही जात दृष्टीहीनांना मदत करणाऱ्या, शोध आणि बचाव मोहिमांमध्ये, तसेच शेतातील कामात सर्वोत्तम ठरते

बर्नीज माउंटन डॉग संवेदनशील स्वभावाचे असतात, ते त्यांच्या सामर्थ्यासाठी आणि गुरे (किंवा इतर कोणत्याही शेतातील प्राण्यांना) हाकण्यासाठी ओळखले जातात

बेल्जियन टर्वुरेन हे "टर्व्स" म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र आणि बुद्धिमान असतात. त्यांना योग्य प्रशिक्षण न दिल्यास कधीकधी अडचणीत आणू शकतात

येथे क्लिक करा