अविनाश सुतार
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल आणि यू.एस. जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) यांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत किती टन सोने पृथ्वीच्या पोटातून काढल्याची माहिती समोर आली आहे
जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या आकडेवारीनुसार आजपर्यंत सुमारे २,१६,००० टन सोने पृथ्वीच्या पोटातून खणून काढण्यात आले आहे
जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या आकडेवारीनुसार आणखी ६४,००० टन सोनं जमिनीखाली साठा म्हणून उरलेले आहे
एकूण सोन्यापैकी दोन तृतीयांश सोने १९५० नंतर काढले आहे. यामागे तंत्रज्ञानातील प्रगती आणि औद्योगिक मागणी हे प्रमुख घटक आहेत
युद्धोत्तर काळात मोठ्या प्रमाणावर ओपन-पिट मायनिंग (उघड्या खाणींमधून उत्खनन) सुरू झालं आणि अधिक कार्यक्षम शुद्धीकरण तंत्र विकसित झाले
खाणींतील खनिज दर्जा घटत असल्याने उत्खननाचा वेग कमी झाला आहे, तरीही जमिनीवरील सोन्याचा साठा दरवर्षी थोड्या प्रमाणात वाढतोच आहे
सुमारे ४५ % सोनं दागिन्यांमध्ये गुंतलेले आहे. तर २२ % सोनं नाणे व बार्स स्वरूपात आहे
तर १७ % सोनं केंद्रीय बँकांकडे आहे, जे महागाई आणि भू-राजकीय अस्थिरतेपासून बचावासाठी राखून ठेवले जाते
उर्वरित सोन्याचा वापर तंत्रज्ञान आणि उद्योगांमध्ये, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश उपकरणांमध्ये केला जातो