संविधानावर आधारित 'हे' चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहिलाचं हवेत

Rahul Shelke

आरक्षण ते न्यूटन…

भारतीय संविधानावर आधारित 6 दमदार चित्रपट. हे चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवेत!

Films on Indian Constitution | Pudhari

आरक्षण (2011)

अमिताभ बच्चन, सैफ अली खान, मनोज बाजपेयी यांच्या दमदार अभिनय असलेला हा चित्रपट कलम 16 वर आधारित आहे. हा सिनेमा भारतातील आरक्षण व्यवस्था, सामाजिक असमानता आणि न्याय-अन्यायाच्या संघर्षाची झलक दाखवतो.

Films on Indian Constitution | Pudhari

आरक्षणचं महत्व

प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शिक्षण, नोकऱ्या, सामाजिक न्याय
या गोष्टींची राजकीय आणि सामाजिक बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.

Films on Indian Constitution | Pudhari

न्यूटन (2017)

राजकुमार रावचा हा नॅशनल अवॉर्ड-विजेता चित्रपट संविधानातल्या मतदानाच्या हक्कावर आधारित आहे. जंगलातील अत्यंत कठीण परिस्थितीतही निवडणूक होऊ शकते, याची झलक न्यूटन चित्रपटात दिसते.

Films on Indian Constitution | Pudhari

अलीगढ (2016)

यात मनोज बाजपेयी यांनी साकारलेली हृदयद्रावक भूमिका आहे. हा चित्रपट कलम 377 आणि LGBTQ व्यक्तींच्या मानवी हक्कांच्या लढ्यावर आधारित आहे. समाजातील पूर्वग्रह आणि एकाकीपणाची भावना यातून प्रभावीपणे दिसते.

Films on Indian Constitution | Pudhari

आर्टिकल 15 (2019)

अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि आयुष्मान खुरानाचा दमदार अभिनय यात आहे. हा चित्रपट आर्टिकल 15, धर्म, जात, लिंग यांच्या आधारावर भेदभावास करता येणार नाही, यावर प्रकाश टाकतो. एका बलात्कार प्रकरणातून जातव्यवस्थेची क्रूरता उघड होते.

Films on Indian Constitution | Pudhari

सेक्शन 375 (2019)

अक्षय खन्ना आणि ऋचा चड्ढाचा कोर्टरूम ड्रामा यात आहे. हा चित्रपट IPCच्या कलम 375 वर आधारित आहे. कायदा, न्याय आणि नैतिकतेचा संघर्ष यात आहे.

Films on Indian Constitution | Pudhari

आर्टिकल 370 (2024)

यामी गौतम, प्रियामणि यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. कलम 370 हटवल्यानंतरचा राजकीय संघर्ष प्रेक्षकांसमोर आणतो. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती आणि सरकारी निर्णयांची पार्श्वभूमी यात दिसते.

Films on Indian Constitution | Pudhari

हे सहा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाहीत

ते आपल्या संविधानाचे मूल्य, संघर्ष आणि शक्ती समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत. संविधान दिवसानिमित्त हे चित्रपट नक्की पहा

Films on Indian Constitution | Pudhari

२ महायुद्धे, २० अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पाहणाऱ्या 'ग्रॅमा' कासवाचा १४१ व्या वर्षी मृत्यू

Galapagos Tortoise Death | Pudhari
येथे क्लिक करा