पुढारी वृत्तसेवा
उत्कृष्ट पाककृती, उच्चभ्रू खरेदीचे पर्याय आणि पंचतारांकित हॉटेल्सच्या उपलब्धतेच्या निकषांवर आधारित २०२५ वर्साषांठी जगातील ५ सर्वाधिक अलिशान शहरांची घोषणा करण्यात आली आहे.
JB.com च्या ताज्या जागतिक लक्झरी निर्देशांकानुसार ही शहरे २०२५ मध्ये उच्चभ्रू जीवनशैलीचे प्रतीक आहेत.
जाणून घेवूया, २०२५ मधील जगातील ५ सर्वात आलिशान शहरांविषयी.
आलिशान शहरांच्या यादीत पॅरिसने अव्वल स्थान पटकावले आहे. शहरात ९०० उत्कृष्ट जेवण देणारे रेस्टॉरंट्स आणि सुमारे १०० हून अधिक पंचतारांकित (5-star) आहेत. यामुळे २०२५ च्या जागतिक आलिशान शहरांच्या यादीत पॅरिस अग्रस्थानी आहे.
आलिशान शहरांच्या यादीत मेलबर्नने दुसरे स्थानावर आहे. भोजन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील आलिशान अनुभवांसाठी या शहराचा समावेश करण्यात आला आहे.
स्वित्झर्लंडमधील झुरिच तिसऱ्या स्थानावर आहे. मजबूत चलन, उच्च दर्जाची जीवनशैली आणि उत्कृष्ट राहणीमान यामुळे हे शहर या यादीत समाविष्ट झाले आहे.
मियामी शहराने जागतिक लक्झरी निर्देशांकात चौथे स्थान पटकावले आहे. येथील उच्च-श्रेणीतील जीवनशैली आणि अति-विशेष सुविधांसाठी या शहराची नोंद घेण्यात आली आहे.
न्यूयॉर्क सिटीलाही या यादीत पाचवे स्थान देण्यात आले आहे. भोजन आणि सेवांच्या विक्रमी उच्च दरांमुळे हे शहर आजही एक अग्रगण्य जागतिक शहरांपैकी एक आहे.