Indian Destinations : कमी खर्चात मोठा आनंद! देशातील 'ही' ६ ठिकाणं देतील अविस्मरणीय अनुभव

नंदू लटके

पर्यटन म्‍हणजे खर्चिक बाब, अशी काहींची कल्‍पना असते. त्‍यामुळे अधिक खर्च होईल, या चिंतेने अनेक जण पर्यटनाचा आनंद घेण्‍यापासून लांबच राहतात.

भारतात अशी सहा नयनरम्य ठिकाणे आहेत जी तुम्‍हाला कमी खर्चात अविस्मरणीय पर्यटन अनुभव देतात.

ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग, क्लिफ जंपिंगच्‍या थराराबरोबरच गंगा नदीच्या किनारी शांत सूर्यास्ताचा अनुभव घेता येतो. येथील स्वस्त हॉस्टेल्स आणि कमी बजेटमधील स्थानिक कॅफे पर्यटनाचा आनंद व्‍दिगुणित करतात.

राजस्‍थानमधील 'गुलाबी शहर' जयपूर आपल्या राजेशाही वाड्यांनी, रंगीबेरंगी बाजारांनी आणि चवदार स्ट्रीट फूडने पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. स्वस्त निवासस्थाने आणि वाहतुकीमुळे कमी खर्चात येथे भारी ट्रिप अनुभवता येते.

हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोडगंजमध्ये तिबेटी संस्कृती आणि शांत पर्वतीय वातावरणाचा संगम पाहायला मिळतो. बजेटमध्ये प्रवास करणारे पर्यटक येथे ट्रेकिंग, मठ आणि आरामदायक कॅफेचा फारसा खर्च न करता आनंद घेऊ शकतात.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी भारताचे हे आध्यात्मिक केंद्र आहे. प्राचीन घाट, भक्तीमय गंगा आरती आणि अरुंद ऐतिहासिक गल्ल्यांसाठी ओळखले जाणारे वाराणसीमध्‍ये जेवण, निवास आणि प्रवासाचे पर्याय स्वस्त आहेत.

शांत समुद्रकिनारे आणि कलात्मक कॅफेंमुळे पाँडिचेरी आरामदायी सुट्टीसाठी परफेक्ट आहे. सायकल भाड्याने घेणे आणि बजेट गेस्टहाऊसमुळे तुमचा संपूर्ण प्रवास 20,000 रुपयांच्‍या आत सहजपणे होतो.

निसर्गप्रेमींसाठी नंदनवन असलेल्या हिमाचल प्रदेशमधील कसोलमध्ये नदीकिनारी दृश्ये, वनभ्रमणाच्या वाटा आणि शांत खेडेगावातील निवासाचा अनुभव मिळतो.

येथे क्‍लिक करा.